कोलंबो- श्रीलंकन समुद्री हद्दीत मासेमारी केल्याचा ठपक़ा ठेवत श्रीलंकेच्या नौदलाने चार भारतीय मच्छीमारांना अटक केल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने एका निवेदनातून दिली आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने दिलेल्या माहिती नुसार भारतीय मच्छीमारांनी आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा पार करत श्रीलंकेच्या सागरी सिमेत प्रवेश करत कोविलम लाईट हाऊस परिसरात मासेमारी केली या प्रकरणी तामिळनाडू येथील चार मच्छीमारांना श्रीलंकेने अटक करत त्यांना आणि त्यांचा जहाजाला जाफना येथील एसएनएलएस एलारा येथे आणत त्यांच्या मेडिकल टेस्ट करण्यात आल्या आणि त्यांना पुढील चौकशीसाठी जाफना येथील मत्सव्यवसाय संचालकांकडे पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे.