श्रीलंका पुन्हा हादरले; पुगोडा शहरात मोठा स्फोट

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरातील आठ बॉम्बस्फोटांची घटना ताजी असतानाच आता कोलंबोपासून ४० किलोमीटर असलेल्या पुगोडा हे शहर स्फोटांच्या आवाजाने हादरले आहे.  स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळाली नाही. या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोलंबोत रविवारी ईस्टरच्या सणावेळी चार हॉटेल्स आणि दोन चर्चमध्ये सकाळी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला. दहशतवाद्यांनी एकूण आठ बॉम्बस्फोट घडवले. या स्फोटांमध्ये ३०० अधिक लोकांचा मृत्यू झाला. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.