SRH vs RCB Sunrisers Hyderabad Miss Qualifier 1 Spot : आयपीएल २०२६ च्या ६७ व्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा ५५ धावांनी पराभव केला. मात्र, आपल्या घरच्या मैदानावर मिळवलेल्या या मोठ्या विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा आली आहे. या विजयानंतर गुणतालिकेत आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांचे प्रत्येकी १८-१८ गुण झाले आहेत. मात्र, नेट रनरेटच्या (NRR) गणितात हैदराबादचा संघ या तिन्हींमध्ये सर्वात मागे राहिला. यामुळे हैदराबादचे अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवून थेट ‘क्वालिफायर १’ खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. केवळ ‘त्या’ एका गणिताने घात केला – हैदराबादला गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवून पहिल्या क्वालिफायरमध्ये जागा पक्की करण्यासाठी आरसीबीला १६५ धावांच्या आत रोखणे अनिवार्य होते. मात्र, २५५ धावांचा पाठलाग करताना आरसीबीने हा आकडा ओलांडला, ज्यामुळे हैदराबादचा विजय होऊनही त्यांचे मोठे नुकसान झाले. आता २६ मे रोजी धर्मशाला येथील मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात ‘क्वालिफायर १’ चा सामना रंगणार आहे, तर हैदराबादला आता ‘एलिमिनेटर’चा खडतर रस्ता पार करावा लागेल. 255 on the board and the bowlers made sure it was never, ever in doubt 🔥#SRH cap off the league stage with a massive 5️⃣5️⃣-run win 🧡 Scorecard ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB | @SunRisers pic.twitter.com/LiQBSJDDR2 — IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026 हैदराबादने वादळी फलंदाजी करत रचला २५५ धावांचा डोंगर – He came, he saw, he brought the F-IYER! 🔥 Updates ▶️ https://t.co/ZcxjefgalG#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvRCB | @RCBTweets pic.twitter.com/tAMAZLicYR — IndianPremierLeague (@IPL) May 22, 2026 तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज केली. दोघांनी ४ षटकांत ४५ धावा जोडल्या; हेड २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकने इशान किशनसोबत ५२ धावांची भागीदारी केली. अभिषेक २२ चेंडूंत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५६ धावा करून बाद झाला. यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी आरसीबीच्या गोलंदाजांची पिस्रे काढली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४८ चेंडूंत ११३ धावांची स्फोटक भागीदारी केली आणि १६.२ षटकांत संघाला २१० धावांवर पोहोचवले. क्लासेन २४ चेंडूंत ५१ धावा करून बाद झाला. हेही वाचा – Virat Kohli Record : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! अॅलेक्स हेल्सला मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम जगातील पहिलाच खेळाडू इशान किशनचे ७९ धावांचे योगदान – इशान किशनने डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ४६ चेंडूंत ३ षटकार आणि ८ चौकारांसह ७९ धावांची अप्रतिम खेळी खेळली. त्याने नितीश कुमार रेड्डीसोबत (१२ चेंडूंत नाबाद २९ धावा) चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. या जोरावर हैदराबादने २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा महाकाय धावसंख्या उभारली होती, ज्याच्या प्रत्युत्तरा दाखल आरसीबीचा संघ २० षटकात ४ बाद २०० धावापर्यंत मजल मारु शकला.