SRH vs PBKS Sunrisers Hyderabad defeated Punjab Kings : आयपीएल २०२६ च्या ४९व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा ३३ धावांनी एकतर्फी पराभव केला आहे. या सलग तिसऱ्या पराभवासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पंजाबची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २३५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ निर्धारित षटकांत सर्वबाद २०० हून अधिक धावा करूनही विजयापासून दूर राहिला. हैदराबादने उभारला धावांचा डोंगर – या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या डावात हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६९ धावांची, तर इशान किशनने ५५ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच अभिषेक शर्मा (३५) आणि ट्रॅव्हिस हेड (३८) यांनी मोलाचे योगदान दिले. ज्यामुळे हैदराबादला ४ बाद २२५ धावांचा डोंगर उभारता आला. पंजाबकडून गोलंदाजी करताना मार्को यान्सन वगळता प्रत्येक गोलंदाजाने एक विकेट्स घेतली. A win that takes the team to the 𝘁𝗼𝗽 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝘁𝗮𝗯𝗹𝗲 🧡 A comfortable 33-run victory at home that takes @Sunrisers to not just 2️⃣ more points but the first spot on the points table 👊🔥 SCORECARD ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS pic.twitter.com/gjgBIMUhG0 — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026 पंजाबच्या फलंदाजांनी टाकली नांगी – Picking a wicket in their first over: Pat Cummins 🤝 Nitish Kumar Reddy 🤝 Eshan Malinga Watch first 2 wickets: https://t.co/sZEnFs41XR#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS pic.twitter.com/A8Mxdv8t6d — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026 प्रत्युत्तरात २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्या (१) आणि प्रभसिमरन सिंग (३) झटपट बाद झाले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मार्कस स्टोइनिस (२८) आणि सूर्यांश शेड्गे (२५) यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कॉनलीच्या शतकानंतर पंजाबचा दुष्काळ कायम – 🅷🆄🅽🅳🆁🅴🅳 A fine ton from Cooper Connolly waging a lone battle 🫡 10th hundred of this #TATAIPL season 🤩#KhelBindaas | #SRHvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/QLYiQRIEoe — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026 दरम्यान लक्ष्य मोठे असल्याने त्यांचाही प्रतिकार अपुरा ठरला. परंतु, कूपर कॉनलीने अखेरपर्यंत झुंज देत शानदार शतकी खेळी साकारली. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशांमुळे पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या १२ वर्षांत पंजाबला हैदराबादच्या घरच्या मैदानात विजय मिळवता आलेला नाही. हेही वाचा – Amanpreet Singh Gill : आयपीएल खेळाडूचे अकाली निधन; विराट कोहलीच्या सहकाऱ्याच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा! सनरायझर्स हैदराबादने पटकावलं अव्वल स्थान – गोलंदाजीतही हैदराबादच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार पॅट कमिन्सने ४ षटकांत ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू शिवांग कुमारनेही २ विकेट्स घेतल्या. या विजयानंतर हैदराबादचा संघ ११ सामन्यांत १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या पराभवानंतर पंजाब १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.