दुबई – सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टो यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे . हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
Innings Break!
A 40 ball 52 by Warner and a brilliant 97 off 55 by Bairstow, propel #SRH to a total of 201/6 on the board.#KXIP chase coming up shortly. Stay tuned.#Dream11IPL pic.twitter.com/pCE0LpW9ln
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2020
सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी केली. फिरकीपटू रवि बिश्नोई याने डेव्हिड वाॅर्नरला मॅक्सवेलकरवी झेलबाद करत ही जोडी फोडत हैदराबादला पहिला धक्का दिला.
डेव्हि़ड वाॅर्नरने 40 चेडूंत (5 चौकार व 1 षटकार) 52 धावा काढल्या. त्यापाठोपाठ जाॅनी बेअरस्टोला पायचीत करत बिश्नोईने माघारी धाडलं. बेअरस्टोचे शतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. त्याने 55 चेंडूत (7 चौकार व 6 षटकार) 97 धावा केल्या.
त्यानंतर एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. शेवटच्या 29 चेडूंत हैदरादबादला अवघ्या 41 धावा काढता आल्या. अब्दुल समद 8(7), मनीष पांडे 1(2) , अभिषेक शर्मा 12(6) आणि प्रियम गर्ग (0) स्वस्तात बाद झाले. केन विलियमसनने 10 चेंडूत (1 चौकार व 1 षटकार) नाबाद 20 धावा केल्या.
पंजाबकडून रवि बिश्नोई याने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3 षटकांत 29 धावा देत 3 गडी बाद केले. अर्शदिप सिंह (4 षटक 33 धावा) आणि मोहम्मद शमी (4 षटक 40 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेल्डन काॅटरेल आणि ग्लेन मॅक्सवेलची गोलंदाजी महागडी ठरली. काॅटरेलने 3 षटकांत 33 धावा आणि मॅक्सवेलने 2 षटकात 26 दिल्या.