मुंबई – आपीएल 2022 मधील 12 वा सामना के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघांमध्ये होत आहे. या सामन्यात लखनौचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, सनरायझर्सने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला आहे. यापूर्वी लखनौने गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना केला आहे.
लखनौ वि. हैदराबाद यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे . कर्णधार विल्यमसनने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
त्याचवेळी लखनौचा कर्णधार केएल राहुलने संघात बदल केला आहे. वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराच्या जागी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला आहे. होल्डर गेल्या मोसमात हैदराबाद संघाकडून खेळला होता आणि या मोसमात लखनौसाठी पदार्पण करताना त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खेळेल.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेईंग-11 ) : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेईंग-11) : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.