पुणे : IPL 2022 मध्ये आज 46 वा सामना खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध टाॅस (नाणेफेक) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#SRH have won the toss and they will bowl first against #CSK
Follow the game here – https://t.co/aLPrrVwUUh #TATAIPL #SRHvCSK pic.twitter.com/nyZsoV3jvK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
चेन्नई संघाने आजच्या सामन्यात दोन मोठे बदल केले आहेत. ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे यांच्या जागी सिमरजित सिंग आणि डेव्हॉन कॉनवे यांचा संघात समावेश केला आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे :
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार. मार्को यान्सन, टी नटराजन, उमरान मलिक
चेन्नई सुपर किंग्ज : रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, सिमरजीत सिंग. अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, महिश थेक्षना, मुकेश चौधरी