भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा
नगर – नगर तालुक्यातील निबोंडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून व अनधिकृत बांधकामावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. विजय सुरेश साबळे (वय 19 रा. निबोंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजु तुकाराम शेंडगे, योगेश राजु शेंडगे, सचिन राजु शेंडगे, सोनाली सचिन शेंडगे (सर्व रा. निबोंडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सामाईक बांधावर उभा असताना आरोपी तेथे आले. मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक बी.पी.गायकवाड करत आहे. दुसऱ्या गटाचे राजु तुकाराम शेंडगे (वय 58 रा. निबोंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पांडूरंग गाढे, प्रवीण राजु शेंडगे, अतुल राजु शेंडगे, दिवित इलू साबळे, प्रेम रिजेश महागिर, आकाश पांडूरंग गाडे, पांडूरंग किसन गाडे, अर्जुन बाळू शिंदे, अक्षय पांडूरंग गाडे (सर्व रा. निबोंडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजु शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी माझ्या घराजवळ अनधिकृत बांधकाम करत होते. यावेळी मी त्यांना बांधकाम करू नका, असे म्हटले याचा राग आल्याने आरोपींनी लोखंडी गजाने व लाथाबुक्कांनी मारहाण केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार जी.बी.नागरगोजे करत आहे. या घटनंनं परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.