मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत अनेक रहस्यमय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता पहायला मिळते. मराठीमध्ये पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ लूक असलेला प्रयोग आगामी ‘विक्की वेलींगकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका आहे. मात्र, ‘मास्क मॅन’च्या मागे कोणाचा चेहरा दडलेला आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता अभिनेत्री स्पृहा जोशीचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे.
Spruha Joshi as Vidya… Stars Sonalee Kulkarni in and as #VickyVelingkar… Saurabh Varma directs the #Marathi film… 6 Dec 2019 release. pic.twitter.com/2FGwoaK4Bw
— taran adarsh (@taran_adarsh) October 17, 2019
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श सोशल मीडियावर यानी तिचा लूक शेअर केला आहे. स्पृहाच पोस्टर प्रदर्शित करुन त्यावर एक कप्शन लिहिण्यात आली आहे. ‘ती विक्कीला वाचवू शकेल?’ या आशयाची कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे. स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे. या चित्रपटात स्पृहाची भूमिका नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल’ अस दिग्दर्शक सौरभ वर्मा यांचं सांगणं आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला होणार प्रदर्शित होणार आहे