‘स्पृहा जोशी’चा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्ही व्हाल घायाळ

मुंबई – मराठी चित्रपटश्रुष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट यामध्ये स्पृहाने साकारलेल्या विलक्षण भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहे. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची स्पृहाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे.

स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात. दरम्यान, स्पृहाने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर असून, त्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. फोटोत तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.