Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्राची पुद्दुचेरीवर मात

नवी दिल्ली –  विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत यश नहार व अंकित बावणे यांच्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने त्रिशतकी धावा उभारल्या व पुद्दुचेरीचा डाव द्विशतकी धावांच्या आत रोखत 137 धावांनी विजय मिळवला.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना नहार व बावणेच्या शतकी खेलीच्या जोरावर 4 बाद 333 धावा केल्या. नहारने 119 धावांच्या खेळीत 120 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांची बरसात केली. बावणेने 110 धावांच्या खेळीत 115 चेंडूंचा सामना केला. त्यात 10 चौकार व 1 षटकार फटकावला. राहुल त्रिपाठीने 59 धावा करत त्यांना योग्य साथ दिली.

विजयासाठी 334 धावांचा पाठलाग करताना पुद्दुचेरीचा डाव 44 षटकांत 196 धावांवर संपला. त्यांच्या सागर त्रिवेदीने 79 धावांची खेळी केली मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही व त्यांना पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकरने 45 धावांत 4 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलशाचा वाटा उचलला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.