जलद बुद्धिबळ स्पर्धेत कपिल लोहाना विजेता

पुणे – अनुभवी खेळाडू कपिल लोहाना याने एक दिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. त्याने सहा गुण मिळविले. ही स्पर्धा व्हिक्‍टोरियस अकादमीने आयोजित केली होती.

ओम लामकाने व निखिल दीक्षित यांचे प्रत्येकी साडेपाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले. रोहन जोशी, श्रीनाथ कृष्णमूर्ती, अथर्व मडकर, गौरव बाकलीवाल यांनी प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली. त्यांना अनुक्रमे 4 ते 7 क्रमांक देण्यात आले. स्पर्धेतील 1201 ते 1400 मानांकनाच्या खेळाडूंचे विभागात ओंकार देशपांडे, मयूर मोघे, दिशा ढोरे, अथर्व देशपांडे, शिवम पांचाळ, उदय मुद्रा यांना अनुक्रमे पहिले सहा क्रमांक देण्यात आले.
1200 पेक्षा कमी मानांकनाच्या खेळाडूंचे विभागात सुनील गोखले, त्रिविक्रम बोंडला, अमोल काळे, प्रथमेश काशीद्‌ यांनी पहिले चार क्रमांक घेतले. बिगरमानांकन विभागात गायत्री शितोळे, राहुल अभ्यंकर व प्रमोद थोरात यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. अक्षय चारी व साईराज गायकवाड यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. 9 व 11 वर्षाखालील गटात अनुक्रमे आदित्य सक्‍सेना व मानस तिवारी विजेते ठरले. मानसी ठाणेकर व प्रदीप कुलकर्णी यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट महिला व ज्येष्ठ खेळाडूचे बक्षीस देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.