मुंबई – गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री ‘कंगना रणावत’ सोशलवर चांगलीच सक्रिय असते. नुकतंच कंगनाला मनकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगा या चित्रपटांतील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोशल मीडियावर कंगना राणावतचा स्टायलिश आणि क्लासी लूक पहायला मिळतो. कंगना सिनेसृष्टीत सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्समुळे खासकरून ओळखली जाते. कंगनाने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि ब्लॅक गॉगल्स लावला आहे. या लूकमध्ये कंगना अतिशय स्टनिंग आणि हॉट दिसत आहे. यापूर्वी देखील कंगनाने आपल्या सोशल मीडियावर साडीतील काही फोटो पोस्ट केले होते.
कंगनाच्या या फोटोवर फॅन्सने अक्षरशः कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत तिच्या या फोटोला जवळपास ७ लाख ३६ हजार लाइक्स मिळाले आहेत. कंगना राणावतचे इंस्टाग्रामवर तब्बल ७.६ मिलियन्स फॉलोव्हर्स आहेत.