* एकरी 400 रुपयांची बचत
बेल्हे – राजुरी (ता. जुन्नर) या गावात मंगळवार (दि.26) पहिल्यांदाच ड्रोन मशिनद्वारे सोयाबीन पिकाला तन नाशकची फवारणी करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढलेला आहे.
पूर्वी शेतकरी बैलांच्या मार्फत शेतीची मशागत करीत असे त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे. दरम्यन, तण नाशकाची पंपाने फवारणी केली असता एका एकरला 1200 ते 1300 रूपये खर्च येतो तर यामध्ये वेळ व औषधेही खुप जातात; परंतु ड्रोन मशिनद्वारे तणनाशक फवारणी केली असता एकरी फक्त 800 रूपये घेतात तर तीन एकर क्षेत्र असले तर त्याचे एक हजार रूपये घेतले जात आहे.
तसेच या ड्रोनद्वारे सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, गहू, हरभरा, तूर तसेच ऊस, मका व सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येत आहे, अशा पद्धतीने शेतकऱ्याने आधुनिकतेकडे वळून शेती करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून पंपाने औषधे मारण्यास वेळ, औषधे, पैसे अधिक जातात; परंतु ड्रोनद्वारे औषधे मारल्यास बचत मोठ्या प्रमाणावर होते, असे ड्रोन ऑपरेटर नारायण भापकर यांनी सांगितले.
“हे मशिन इस्राईल या देशातून मागवले असून 15 लाख रूपये त्याची किंमत आहे. बॅटरीवर ते चालत असून 10 लिटर पाणी बसेल इतकी त्याची क्षमता आहे.”
– नारायण भापकर, ड्रोन ऑपरेटर