चंद्रपूर- राज्यातील इतर भागात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी कोरोनामुळे घरी परतले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली (न.प. वरोरा) यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी वरोरा शहरात फवारणी सुरु आहे.
नगर परिषदेकडून वरोरा शहर निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाची लागण रोखण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण अद्याप आढळला नाही तरीही विशेष काळजी घेतल्या जात आहे.
दरम्यान, हे लाॅकडाऊन म्हणजे बंदी नाही तर कोरोनावर मात करण्याची संधी आहे. त्यामुळे सगळ्यांनी या बंदीचं पालन करा, असं आवाहन त्यांनी वरोरा वासियांना केलं आहे.