मंचर, (प्रतिनिधी) – मंचर शहरामध्ये डेंगू आजाराविरोधात उपाययोजना करून जनजागृती करावी. स्वच्छता करून धूर फवारणी करण्याबाबत भाजप किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय थोरात यांनी मंचर नगरपंचायतीला पत्र दिले आहे.
मंचर नगरपंचायतीला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मंचर शहरांमध्ये सध्या पावसाची उघडझाप चालू आहे. शहरात ठीक ठिकाणी पाण्याची डबके तयार झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज उघडे आहेत.
त्यामुळे मंचर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भभवू शकते. डेंगू रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून शकतात. शहरांतील सर्व प्रभागांमध्ये फवारणी करावी तसेच जनजागृती नागरिकांमध्ये करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.