#CoronaVirus : खेळाडू बेकार तर, अन्य बेरोजगार

नवी दिल्ली – चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्‍यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताबाबत बोलायचे झाले तर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करत असलेले खेळाडू आता बेकार होऊन घरी बसले आहेत, तर या स्पर्धांच्या आयोजनांमुळे हाताला काम मिळणारे व घर चालविण्यासाठी मेहनत करणारे बेरोजगार झाले आहेत.

एनबीए (नॅशनल बास्केटबॉल लीग), अमेरिकन फुटबॉल, जागतिक स्तरावरील विविध स्पर्धा, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह अन्य स्पर्धा तसेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आदी स्पर्धा रद्द तरी झाल्या आहेत, आणि पुढेही ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेले खेळाडू आता निवांतपणे घरी बसणार आहेत. इतकेच नाही तर या स्पर्धांच्या तयारीसाठी अनेक जणांना रोजगार मिळतो तेही आता मिळणार नसल्याने घर कसे चालवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

विविध स्पर्धांसाठी त्या त्या शहरात येणारे खेळाडू, त्यांची निवासव्यवस्था, वाहन व्यवस्था आदींसाठी अनेक जण राबत असतात. तसेच सामने पाहण्यासाठी येणारे क्रीडाप्रेमी स्थानिक पातळीवरील व्यावसायिकांसाठी खरेदीच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करुन देतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.