सरकार अंतिम निर्णय घेईन – कोहली

विशाखापट्टणम – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामन्याबाबत भारत सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय अंतिम असणार आहे. आम्ही सरकारचा आदर करत असल्याने बीसीसीआय आणि सरकारचा जो निर्णय होईल त्याला भारतीय संघाचा पाठिंबा असेल, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळू नये. अशी भारतीयांकडून मागणी होत आहे.

मुंबई दहशवादी हल्ल्‌यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटची द्विपक्षीय मालिका होत नाही. हे संघ आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच आमनेसामने होतात. तर पुलवामा हल्ल्‌यानंतर भारतीय संघाने विश्वचषकातही पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी अनेकांची भूमिका आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा विश्वचषकातील सामना 16 जून रोजी नियोजित आहे.

दहशतवादी हल्ल्‌यात प्राण गमवावे लागलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचाही विराटने सांगितले. विराट म्हणाला, संपूर्ण राष्ट्राला काय हवे आहे आणि बीसीसीआय जे सांगेन ते आम्ही करणार आहोत. घडलेल्या वाईट प्रसंगामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून आम्ही दुःखी आहोत. ज्या जवानांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांविषयी भारतीय संघाला सहनुभूती आहे.

भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध सामने खेळावे की नाही याबाबत भारतीय प्रशिक्षक रवी शात्री यांनी मत मांडले होते. कोहलीही त्याच मतांचा आहे. याबाबतचा संपूर्ण निर्णय हा बीसीसीआय आणि भारत सरकार घेईन. कारण एकुण परिस्थीती काय आहे याची त्यांना चांगली कल्पना आहे. त्यामुळे ते निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील आम्ही त्याचे अनुकरण करू. जर भारत सरकारला वाटले की हा विषय खूप संवेदनशील आहे आणि आम्ही न खेळलेले बरे तर मी सरकारच्या निर्णयाचा आदर करू, असेही कोहली म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.