जलतरण स्पर्धेत अनिरुद्ध खांटेला सहा सुवर्ण

पुणे – अखिल भारतीय स्पोर्टस काउन्सिल ऑफ द डेफ आणि चेन्नई स्पोर्टस काउन्सिल ऑफ द डेफ यांच्यातर्फे आयोजित चेन्नई येथे आयोजित तेविसाव्या राष्ट्रीय वरिष्ठ मुकबधीर चॅम्पियनशिपमध्ये एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनिरुद्ध खांटे याने जलतरण स्पर्धेच्या सर्व प्रकारात 6 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकत महाराष्ट्रातर्फे सर्वसाधारण विजेता पदकावरही आपले नाव कोरले.

इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचा विद्यार्थी अनिरुद्ध खांटे नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या तेविसाव्या राष्ट्रीय वरिष्ठ मुकबधीर चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रातर्फे जलतरण स्पर्धेत सहभागी झाला होता. जलतरणाच्या 50, 100 आणि 200 मीटर बॉक स्ट्रोक प्रकारात सुवर्ण, चार बाय 50 मीटर फ्रीस्टाईल रिले, चार बाय 50 मीटर मिडले रिले आणि चार बाय 50 मीटर फ्रीस्टाईल मिक्‍स्ड रिले प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.

तसेच 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकत एकूण 7 पदकावर आपले नाव कोरले. प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे अधिष्ठाता प्रा. अनंत चक्रदेव, प्रा. पद्माकर फड यांनी या खेळाडूचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.