kutimb

सोलारीस टेनिस स्पर्धा : पुण्याच्या किर्तने, कामत यांना दुहेरी मुकुट

केतन, श्रीकांत, सुरेश यांना एकेरीमध्ये विजेतेपद

पुणे – सोलारीस क्‍लब आयोजित वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नितीन किर्तने, केतन धुमाळ, अजय कामत यांच्यासह नाशिकच्या श्रीकांत पारेख व एम. सुरेश यांनी एकेरीमध्ये आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले.

35 वर्षांवरील गटामध्ये पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश केलेल्या पुण्याच्या केतन धुमाळने पुण्याच्याच नीरज आनंद याचा 6-3, 6-3 असा पराभव केला. 45 वर्षांवरील गटामध्ये नितीन किर्तनेने मुंबईच्या नीलकंठ डाबरेचा 6-2, 6-1 असा पराभव केला.

55 वर्षांवरील गटात पुण्याच्या अजय कामतने निर्मल कुमारचा 6-0, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवले. 65 वर्षांवरील गटात एम. सुरेशने अब्दुल हनिफचा 6-4, 6-4 असा पराभव करून या गटाचे विजेतपद संपादन केले. 70 वर्षांवरील गटात श्रीकांत पारेखने गंगाधरन एस. यांचा 6-2, 6-0 असा पराभव केला.

दुहेरीच्या 55 वर्षांवरील गटामध्ये अजय कामत व जयंत कढे या जोडीने मेहर प्रकाश व चेतन देसाई या जोडीचा 6-3, 6-2 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 45 वर्षांवरील गटात नितीन किर्तने व संदीप किर्तने या बंधू जोडीने मुकूंद जोशी व आर. कुलकर्णी या जोडीचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 35 वर्षांवरील गटामध्ये पुण्याच्या मंदार वाकणकर व अभिषेक ताम्हाणेने विजय आनंद व अफरोझ खान या जोडीचा 6-3, 6-3 असा पराभव केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्‍लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.