ज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी अजिंक्‍य

पुणे -अशोक केदारी यांनी कासम शेखचा संघर्षपूर्ण पराभव करत येथे पार पडलेल्या सिंहगड परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्‍लबच्या वतीने आयोजित केलेल्या ज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात अशोक केदारी यांनी पहिला सेट 25-23 अशा फरकाने आपल्या नावे केला. यावेळी पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या तोडीस तोड खेळ करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. मात्र, केदारी यांनी अखेरच्या काही क्षणांमध्ये बाजी मारत पहिला सेट आपल्या नावे केला.

तर, दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी सामन्यात रोमांचक परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे सामना दोन्ही बाजूंनी झुकलेला असताना केदारी यांनी 25-22 अशा फरकाने दुसऱ्या सेटसह सामना आपल्या खिशात घातला. यावेळी हा अंतिम सामना तब्बल तीन तास चालल्याने सामन्याचा रोमांच आणखीनच वाढला होता.

तत्पूर्वी, केदारी यांनी उपान्त्य सामन्यात रामचंद्र भागवत यांचा 25-20, 25-22 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. यावेळी रामचंद्र भागवत यांना तिसरा तर शाम जगताप यांना चौथा क्रमांक मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.