ऍमडॉक्‍स्‌, गालाघर संघांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे – आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19स्पर्धेत ऍमडॉक्‍स्‌, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन व गालाघर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.

व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात रोहित लालवाणीच्या जलद 66 धावांच्या बळावर ऍमडॉक्‍स्‌ संघाने सिटी संघाचा 68 धावांनी पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना ऍमडॉक्‍स्‌ संघाने 20 षटकात 7 बाद 198 धावा केल्या. 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद खटावकर व शुभम घोडेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सिटी संघ 20 षटकात 7 बाद 130 धावांत गारद झाला. 44 चेंडूत 66 धावा करणारा रोहित लालवाणी सामनावीर ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लेजेन्डस्‌ क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने परसिस्टंट सिस्टीम संघाचा 6 गडी राखून पराभव केला, तर गालाघर संघाने व्हेरीटास संघावर 5 धावांनी निसटता विजय मिळवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)