जस क्रिकेट अकादमीची विजयी ‘हॅट्ट्रिक’

व्हिजन क्रिकेट अकादमीचा 10 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे – युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत मानव पांडे (49 धावा व 2-19) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जस क्रिकेट अकादमीने व्हिजन क्रिकेट अकादमीचा 10 धावांनी पराभव करत सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना जस क्रिकेट अकादमीने 20 षटकांत 9 बाद 126 धावा केल्या. यात मानव पांडेने 46 चेंडूत 4 चौकारांसह 49 धावांची संयमी खेळी केली. मानवला अनुज पुरीने 24 धावा, तनिष्क सिंगने 10 धावा काढून संघाला 126 धावाचे आव्हान उभारून दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अकादमीचा डाव 19.3 षटकांत 116 धावावर संपुष्टात आला. यामध्ये मल्लिका प्रकाश शेट्टी 19, जतीन हेगडे 19, उत्सव आनंद 17, श्रेय सराफ 14 यांनी प्रतिकार केला. जस क्रिकेट अकादमीकडून अनुज पुरी (3-12), मानव पांडे (2-19), नवशिष्ट गिरी (2-20), तनिष्क सिंग (1-18), आलोक बोबडे (1-19) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर अष्टपैलू कामगिरी करणारा मानव पांडे ठरला.

दुसऱ्या सामन्यात हिमांशू चौगुले (1-12 व 13 धावा) याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने संजय क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

सविस्तर निकाल

साखळी फेरी : जस क्रिकेट अकादमी: 20 षटकांत 9 बाद 126 धावा (मानव पांडे 49 (46,),अनुज पुरी 24(35), तनिष्क सिंग 10. अथर्व पिसाळ 2-16, आदित्य पत्की 1-12, रजत देवकर 1-21, जतीन हेगडे 1-27) वि.वि.व्हिजन क्रिकेट अकादमी : 19.3 षटकांत सर्वबाद 116 धावा (मल्लिका प्रकाश शेट्टी 19, जतीन हेगडे 19, उत्सव आनंद 17, श्रेय सराफ 14. अनुज पुरी 3-12, मानव पांडे 2-19, नवशिष्ट गिरी 2-20, तनिष्क सिंग 1-18, आलोक बोबडे 1-19).

संजय क्रिकेट अकादमी: 20 षटकात 6 बाद 101 धावा (पृथ्वी सिंग 27(28), स्वजय सुतार 14, आदित्य कड 2-25, हिमांशू चौगुले 1-12, वरद पाटील 1-16) पराभूत वि. किरण क्रिकेट अकादमी : 16.1 षटकांत 4बाद 104 धावा (रुद्रव श्रीभाते 31 (23,), अथर्व पाटील 20 (14), रेहान तांबोळी नाबाद 23 (28), हिमांशू चौगुले 13, मिंकेत परदेशी 1-25, विप्रव चावला 1-16, पृथ्वी सिंग 1-17);सामनावीर-हिमांशू चौगुले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.