इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या संघाला सर्वसाधारण जेतेपद

पुणे – भारती विद्यापीठ, पुणे आयोजित आंतर महाविद्यालयीन बॉस्केटबॉल स्पर्धेत एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या महिला बॉस्केटबॉल संघाने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाचा 26-21 असा पराभव करत सुवर्णपदक व स्पर्धेचे सर्वसाधारण जेतेपद आपल्या नावे केले.

भारती विद्यापीठाच्या विद्यमानाने आंतर महाविद्यालयीन बॉस्केटबॉल स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 12 विविध महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या महिला बॉस्केटबॉल संघाने आपली चार ही सामने जिंकत सुवर्णपदकावर नाव कोरले. पहिल्या सामन्यात डीईएस लॉ कॉलेज संघाचा 28-24, दुसऱ्या सामन्यात सिंबायोसिस लॉ स्कूल या संघाचा 25-16 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे संघासोबत झाला. या सामन्यात एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन संघाने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 24-19 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामना एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघात झाला. हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यांतरापर्यंत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने बढत घेतली होती. मध्यांतरानंतर एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या हरमिता चुंडावत हिने केलेल्या गोलच्या जोरवर एमआयटी संघाने बढत घेतली. शेवटी हा सामना 24-19 अशा फरकाने जिंकत एमआयटी संघाने विजेतेपद मिळवले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या हरमिता चुंडावत हिला गौरविण्यात आले.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. अनंत चक्रदेव यांनी विजयी संघाचे
अभिनंदन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.