वरिष्ठ राज्य मैदानी स्पर्धा : दोनशे मीटर्स शर्यतीत जयकुमार गावडे विजेता

मुंबई – पुण्याच्या जयकुमार गावडे याने पुरुषांच्या 200 मीटर्स शर्यतीत अव्वल स्थान घेतले व वरिष्ठ गटाच्या राज्य मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याला हे अंतर पार करण्यास 21.49 सेकंद वेळ लागला.

मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुषांच्या 200 मीटर्स शर्यतीत ठाण्याच्या अक्षय खोत याने 21.75 सेकंद वेळ नोंदवित दुसरा क्रमांक मिळविला. त्याचा सहकारी अजित सिंग (21.90 सेकंद) याने तिसरे स्थान घेतले. 400 मीटर्स अडथळा शर्यतीत कोल्हापूरचा कृष्णात पाटीलने 54.82 सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. कोल्हापूरचाच भुषण पाटील 55.82 सेकंद वेळ नोंदवत दुसरा आला.

महिलांच्या भालाफेकीत पुण्याच्या गीता शिंदेने (39.29 मीटर्स) तर, पुरुषांच्या भालाफेकीत पुण्याचाच जयदीप सिंगने (69.65 मीटर्स) सुवर्णपदक पटकावले.200 मीटर्स स्पर्धेमध्ये डिआंड्रा वलडारेस हिने 23.98 सेकंद वेळेसह अव्वल स्थान मिळविले. रत्नागिरीची मंजिरी रेवाळे (25.22 सेकंद) व मुंबई शहरच्या सरोज शेट्टी (25.37 सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी डिआंड्राने 100 मीटर व महिलांच्या 4 बाय 100 मीटर्स रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.400 मीटर्स शर्यतीत ठाण्याच्या निधी सिंग हिने 57.29 सेकंद वेळेसह प्रथम क्रमांक पटकाविला. अकोल्याची सोनिया मोकल 58.87 सेकंदसह दुसरी तर, पुण्याची संगीता शिंदे 59.65 वेळ नोंदवत तिसरी आली. 400 मीटर्सअडथळा शर्यतीत ठाण्याच्या निधी सिंग हिने 1 मिनिट 4.83 सेकंद वेळ नोंदवित सोनेरी कामगिरी केली. ठाण्याची दामिनी पेडणेकर (1 मिनिट 8.05 सेकंद) व साता-याची सुनिता जाधव (1 मिनिट 10.20 सेकंद) अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानी आल्या. महिलांच्या 4 बाय 400 मीटर्स रिलेमध्ये आकांक्षा गावडे, स्नेहल शिंदे, एकता गोऊलकर व निधी सिंग यांनी ठाणे संघाला 3 मिनिट 59.30 सेकंद वेळेसह सुवर्णपदक मिळवले.
पुण्याने (संगीता शिंदे, ऋतिका पानसरे, सिद्धी जाधव, यमुना लडकत यांनी 4 मिनिट 0.20 सेकंद) दुसरे स्थान मिळविले तर, नागपूरचा संघ (रुथ चार्ल्स, भार्गवी मेश्राम, सखी शेंडे, यामिनी ठाकरे 4 मिनिटे 27.18 सेकंद) तिस-या स्थानी आला. 3 हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये नाशिकच्या कोमल जगदाळे हिने सुवर्णपदक पटकविताना 10 मिनिट 35.37 सेकंद वेळ नोंदविली. तिहेरी उडीत प्रगती संकपाळ हिने 11.23 मीटर्स अंतर पार करत चमक दाखवली. पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये मुंबई उपनगरच्या जय शाहने 15.30 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक मिळवले.

पुरुषांच्या 400 मीटरमध्ये पुण्याच्या बलजितने 48.43 सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. मुंबई उपनगरचा राहुल कदम (48.59 सेकंद) व पालघरचा योगेश मेहेर (49.12 सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान घेतले. 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये साता-याच्या आदित्य भोसले याला सोनेरी यश मिळाले. त्याने 9 मिनिट 39.67 सेकंद वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळवले. 800 मीटर शर्यतीत नाशिक चैतन्य होलगरे याने 1 मिनिट 55.26 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)