नरेंद्र राम, प्रियंका भट यांना 24 तास स्टेडियम रनचे जेतेपद

मुंबई – एनईबी स्पोर्टस आयोजित 24 तास स्टेडियम रनमधील चौथ्या सत्रात नवी दिल्लीच्या नरेंद्र रामने पुरुष गटात 165.6 किमी अंतर पार करत सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदावर नाव कोरले. तर, महिला गटात मुंबईच्या प्रियंका भटने 151.6 किमी अंतर पार करत बाजी मारली. माझे लक्ष्य आता पुढच्या स्पर्धेवर आहे. असे चॅम्पियन नरेंद्र राम म्हणाला. या स्पर्धेत 100 हून रनर्स सहभागी झाले होते त्यापैकी 24 तास गटात 36 जणांचा समावेश होता.

नरेंद्र व प्रियंकाने उन, दमट हवामान, कमी झोप या सर्वांचा सामना करत 24 तास धावण्याच्या या शर्यतीत स्वत:ची छाप पाडली. पुरुष गटात 24 तास रनमध्ये अमर शिव देवने 156 किमीसह दुसरे तर, देवी प्रशांथ सुरेश शेट्टी याने 153.2 किमी गटात कांस्यपदक मिळवले. महिला गटात अपेक्षा शाहने 116.8 किमी अंतरासह चमक दाखवली.
तसेच 12 तास रनमध्ये गिनो अँटनीने चमक दाखवली. त्याने पुरुष गटात 109.134 किमी अंतर पार केले तर, सतिश कुमार आर.याने 102.366 किमी सह रौप्य तर, रहीम के.एस. यांनी 91.575 किमी अंतरासह तिसरे स्थान पटकावले. महिलांच्या गटात बबिता बारुवतीने 80.925 किमीसह अव्वल स्तान मिळवले. प्रीती लालाने 78.435 किमीसह दुसरे तर, सुनैना पटेलने 77.19 किमीसह कांस्यपदक पटकावले.

फ्रांसच्या ले मंस रेसकडे पाहता 24 तासांच्या स्टेडियम रनमध्ये रनर्सला चमक दाखवायची होती. 2019 सालच्या आयएयु 24 तास जागतिक अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रता स्पर्धा होती.आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई अर्ध मॅरेथॉन 2019 साठी तयारी करण्यासाठी देखील हा स्पर्धेला महत्व होते. स्टेडियम रनला शनिवारी 15 जूनला पाच वाजता सुरुवात झाली तर, 16 जूनला संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा संपली. यामध्ये 24 तास वैयक्तिक, 12 तास वैयक्तिक, 12 तास खुली टीम रिले व 12 तास कॉर्पोरेट टीम रिले अशा गटाची विभागणी करण्यात आली. 250 हून अधिक रिले संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सर्व स्टेडियम रनमध्ये 2000 हून अधिक रनर्सनी सहभाग नोंदवला.व एकत्रितपणे 84,756 लॅप्स (33,902.4 किमी) पुर्ण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.