पुणे जिल्हा वरिष्ठ गट वार्षिक मैदानी स्पर्धा
पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे होणाऱ्या पुणे जिल्हा वरिष्ठ गट वार्षिक मैदानी स्पर्धांच्या पुरुषांची पाच हजार मीटर्स धावण्याची शर्यत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचा सावन बरवाल ने 15 मि. 21.8 से. वेळ नोंदवित प्रथम क्रमांकाने जिंकली. दुसरा क्रमांक क्रीडाप्रबोधिनीच्या लक्ष्मण दरवाडा तर तृतीय क्रमांक बेंगळे स्पोर्टस अकॅडमी च्या वीरेंद्र काळे ने पटकावला.
महिला गटातील स्पर्धा पाच हजार मीटर्स धावण्याची शर्यत इलाईट रनर्स क्लब च्या विनया मालुसरे ने 19 मि. 47.9 से. वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे लक्ष्य अकादमीच्या शीतल भगतने आणि इलाईटच्याच वृषाली उत्तेकरने मिळवला.