नाशिक – महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आणि केंनसिंगटन क्लब यांच्या सहकार्याने नाशिकच्या केनसिंगटन क्लब येथे भारताच्या ब्रीज खेळाच्या ज्युनियर संघाचे सहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याआधी मे महिन्यात नाशिक येथेच ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धात 12 ते 16 वर्षांआतील गट, 17 ते 21 वर्षांआतील गट आणि 22 ते 26 वर्षांच्या आतील गट आणि मुलीसाठी एक गट अशा चार गटांचा समावेश होता. या राष्ट्रीय स्पर्धेमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे या चार गटांसाठी भारताच्या संघाची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली. या प्राथमिक निवड झालेल्या खेळाडूंसाठी केनसिंगटन क्लब, नाशिक येथे प्रशीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये 24 मुले आणि 9 मुली सहभागी झाल्या आहेत.