पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धा : व्हेरॉक संघाची केडन्स संघावर मात

व्हेरॉकच्या विनय पाटीलची दमदार शतकी खेळी

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विनय पाटील (नाबाद 142 धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने केडन्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवत पहिला विजय नोंदविला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशीचा खेळ व्हेरॉक संघ 13 षटकांत 1 बाद 85 धावा अशा डावापासून पुढे सुरु झाला. काल केडन्स संघाचा डाव 39.3 षटकांत 174 धावांवर संपुष्टात आला. याच्या उत्तरात व्हेरॉक संघाने 40 षटकांत 3 बाद 327 धावा करून 138 धावांची आघाडी घेतली. 3 गडी बाद झाल्याने व्हेरॉकची अंतिम धावसंख्या 312 झाली. यात विनय पाटीलने धडाकेबाज फलंदाजी करत 155 चेंडूत 12 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 142 धावा, तर मिझान सय्यदने 84 चेंडूत 59 धावा केल्या. विनय आणि मिझान यांनी दुसऱ्या गडयासाठी 187 चेंडूत 151 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 24 चेंडूत 49 धावा केल्या. केडन्सकडून गणेश गायकवाडने 51 धावात 3 गडी बाद केले.

दुसऱ्या डावात केडन्स संघाने 20षटकात 7बाद 195धावा केल्या. पण त्यांचे 7 गडी बाद झाल्याने केडन्सची धावसंख्या 160झाली. यात गणेश गायकवाडने 47 चेंडूत 73धावा, अथर्व धर्माधिकारीने 62 चेंडूत 52 धावा केल्या. व्हेरॉककडून कार्तिक पिल्ले 4-30-2, ऍलन रॉड्रिगेस 3-33-2, विशाल गीते 3-32-2यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेरॉकला निर्धारित षटकात विजयासाठी 23धावांची गरज होती. पण व्हेरॉकने हे आव्हान 8.5षटकात 2बाद 73धावा केल्या. यात सुधांशू गुंडेतीने 33 चेंडूत नाबाद 38धावा, विनय पाटीलने 14धावा व उत्कर्ष अगरवालने नाबाद 17धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला. सामनावीर हा ‘किताब विनय पाटील याला देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक:

साखळी फेरी : पहिला डाव: केडन्स: 39.3 षटकांत सर्वबाद 174 ( निखिल पराडकर 86, गणेश गायकवाड 54, इझान सय्यद 21(41), शुभम तैस्वाल 5-41, कार्तिक पिल्ले 2-23, उत्कर्ष अगरवाल 1-17) वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 40 षटकांत 3 बाद 312 (सुधांशु गुंडेती 48, विनय पाटील नाबाद 142, मिझान सय्यद 59, ऋतुराज गायकवाड 49, गणेश गायकवाड 3-51); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 138 धावांची आघाडी;

दुसरा डाव : केडन्स: 20 षटकांत 7 बाद 160 (गणेश गायकवाड 73, अथर्व धर्माधिकारी 52, कार्तिक पिल्ले 2-30, ऍलन रॉड्रिगेस 2-33, विशाल गीते 2-32) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : 8.5 षटकांत 2 बाद 73 (सुधांशू गुंडेती नाबाद 38,उत्कर्ष अगरवाल नाबाद 17, विनय पाटील 14, अक्षय वाईकर 2-22)

Leave A Reply

Your email address will not be published.