हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे  -उपांत्य फेरीत हितेश वाळुंज (4-28) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने 29.5 षटकात 216 धावाचे आव्हान उभे केले. यात ओंकार खाटपेने 61 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 63 धावा व कीर्तिराज वाडेकरने 31 चेंडूत 32 धावा केल्या. ओंकार व कीर्तिराज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 47 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर धनराज शिंदे 48, अविनाश शिंदे 31, प्रसन्ना मोरे 18 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. डेक्कन जिमखाना संघाकडून आशय पालकर (4-51), धीरज फतंगरे (3-20), आर्यन बांगळे (2-41) यांनी सुरेख गोलंदाजी करत हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाला 216 धावांवर रोखले.

या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाला 30 षटकात 8 बाद 176 धावांपर्यंतच मजल मारता आली. यात तुषार श्रीवास्तवने एकाबाजूने लढताना 78 चेंडूत 89 धावांची खेळी केली. पण तुषार बाद झाल्यानंतर आशय पालकरच्या 29 धावा, आर्यन बांगळेच्या नाबाद 14 धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. हेमंत पाटील क्रिकेट अकादमीकडून हितेश वाळुंज(4-28), आकाश जाधव(3-39) अफलातून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.