स्पार्क क्रिकेट अकादमी संघाचा विजय

पुणे – कनक सहस्त्रबुद्धे (3-9) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पार्क क्रिकेट अकादमी संघाने जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) संघाचा 24 धावांनी पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 111 धावा केल्या. यात शुभ दुबेने 36 धावा व पुष्कर कारखीळेने 36 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) संघ 19.1 षटकांत 87 धावांवरच गारद झाला. यात शिव हरपाळे 31, रणवीर सिंग चौहान 12, श्रेयश यादव 11 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.