पुण्यात आजपासून ब्रीज स्पर्धा

पुणे -महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि पी.वाय. सी. हिंदू जिमखाना यांच्या मोलाच्या सहकार्याने दि. 26 ते 28 एप्रिलदरम्यान 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेचे आयोजन पीवायसी, हिंदू जिमखाना येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हाचे एकूण 230 खेळाडू सहभागी होणार आहेत.

यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत पदके प्राप्त केलेले राजू तोलानी, अशोक वैद्य, कौस्तुभ बेंद्रे, अनिल पाध्ये, अजय खरे, अरुण बापट, राजेंद्र गोखले, मिलिंद आठवले, दीपक पोद्दार, हेमा देवरा, अलका क्षीरसागर आदी खेळाडूंचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.