टी-20 क्रिकेट स्पर्धा : अर्न्स्ट अँड यंग, हनिवेल, सॉफ्टहार्ड संघांची आगोकुच

5वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – अर्न्स्ट अँड यंग, हनिवेल व सॉफ्टहार्ड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे होत असलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकुच नोंदवली.

व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंन्डस्‌ क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अर्न्स्ट अँड यंग संघाने टिएटो संघाचा 78 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना वरूण गुजरच्या नाबाद 56 धावांसह अर्न्स्ट अँड यंग संघाने 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. 188 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना रविंद्र चौहाण, विश्‍वजीत उधान व आकाश जाधव यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टिएटो संघ 11.5 षटकांत सर्वबाद 40 धावांत गारद झाला. 8 धावांत 5 गडी बाद करणारा रविंद्र चौहाण सामनावीर ठरला.

दुसऱ्या लढतीत प्रमोद बारवकरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हनिवेल संघाने 20 षटकांत 5 बाद 239 धावा केल्या. प्रमोद बारवकरने 59 चेंडूत नाबाद 100 धावा करत संघाचा डाव मजबुत केला. 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मेहबुबली जळगावकर, मछिंद्र शागर, अहमद मोहम्मद, रवी पवार व मयुर कुंभार यांच्या अचूक गोलंदाजीपुढे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड संघ केवळ 13.2 षटकांत सर्वबाद 51 धावांत गारद झाला.

प्रमोद बारवकर सामनावीर ठरला. हनिवेल संघाने किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड संघाचा 188 धावांनी दणदणीत पराभव केला. अन्य लढतीत सॉफ्टहार्ड संघाने एलटीआय संघाचा 22 धावांनी पराभव करत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.