फिनआयक्‍यू करंडक : नील केळकर, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद

पुणे -मुलांच्या गटात नील केळकर याने, तर मुलींच्या गटात प्रिशा शिंदे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे पार पडलेल्या नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्‍यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मेट्रोसिटी स्पोर्टस क्‍लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या

स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत मुलींच्या गटात चौथ्या मानांकित प्रिशा शिंदेने तिसऱ्या मानांकित मृणाल शेळकेचा 5-4(5), 4-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. याआधीच्या उपांत्य फेरीत प्रिशाने रित्सा कोंडकरचा 6-0 असा एकतर्फी सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रिशा ही संस्कृती स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून सोलारीस क्‍लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटातील हे दुसरे विजेतेपद आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बिगरमानांकित नील केळकरने दुसऱ्या मानांकित द्रोण सुरेश यांचा 4-1, 5-3

असा पराभव करत विजेतेपद पटकावले. नीलने उपांत्य फेरीच्या लढतीत दहाव्या मानांकित शौनक सुवर्णाचा 6-2 असा पराभव करत अंतिम फरीत प्रवेश केला. नील हा सिंबायोसीस शाळेत तिसरी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना क्‍लब येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.