फुरसुंगी येथे रंगणार निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा

पुणे -समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेला 100 वर्षापेक्षा मोठी परंपरा असून महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल यामध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवार, दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शिवशंभो स्टेडियम फुरसुंगी येथे या निकाली कुस्त्या रंगणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण 30 लाखाची रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पंजाबचा हिंदकेसरी पै. रुबल विरुद्ध भारत केसरी रुस्तम ए हिंद पै.हितेश कुमार यांची कुस्ती विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय भारत केसरी पै. सोमवीर विरुद्ध वस्ताद सतपाल यांचा पठ्ठा सत्येंद्र कुमार, महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख विरुद्ध पुण्याचा गणेश जगताप, माऊली जमदाडे विरुद्ध शिवराज राक्षे, साईनाथ रानवडे विरुद्ध निलेश लोखंडे, मुन्ना झुंझुरके विरुद्ध कौतुक डाफळे या नामवंत मल्लांच्या कुस्त्या यामध्ये होणार आहेत. या कुस्त्यांमधील विजेत्या पैलवानाला चांदीची गदा बक्षीस म्हणून दिली
जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.