ऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

पुणे  – ऋतुजा गोरे हिने शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धा विधिशा (मध्यप्रदेश) येथे पार पडल्या. तिने 19 वर्षा खालील मुलींच्या गटातून 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत तिने मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, हरियाना या संघाच्या खेळाडूंचा पराभव केला. तसेच नुकत्याच संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत 59 किलो वजनी गटामधून तिने सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात तिने संयुक्त अरब अमिरातीच्या खेळाडूंचा 14-2 ने पराभव केला.

या स्पर्धेत भारतातील 13 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण व 4 कांस्य पदकाची कमाई केली. मागील वर्षीही ऋतुजाने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. शिमोगा, कर्नाटक येथे झालेल्या फेडरेशन राष्ट्रीय स्पर्धेतही ऋतुजाने सुवर्णपदक पटकावले.

Leave A Reply

Your email address will not be published.