क्रिकेट : टायफून्सची वॉरियर्सवर मात

पुणे -गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करून टायफून्स संघाने वॉरियर्स संघाचा 16 धावांनी पराभव करत येथे सुरू असलेल्या पूना क्‍लबच्या वतीने आयोजित पूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

पूना क्‍लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. यात टायफून्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांत 61 धावा केल्या. यात अश्‍विन शहाणे 16 चेंडूंत 3 चौकारांसह 23, तर विमल हंसराजने 18 चेंडूंत 2 चौकारांसह 28 धावा केल्या. यानंतर टायफून्सच्या अचूक गोलंदाजीसमोर वॉरियर्सच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. वॉरियर्सला 7 बाद 45 धावाच करता आल्या.

यावेळी झालेल्या दुसऱ्या लढतीत ऑल स्टार संघाने जॅग्वॉर्स संघावर 8 गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या जॅग्वार्स संघाला 5.2 षटकांत सर्वबाद 29 धावांचीच मजल मारता आली. यावेळी ऑल स्टार्सच्या पवित पथेजाने 8 धावा देत 2 गडी बाद केले. तर, रोहित आचार्यने 4 धावा देत 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना ऑल स्टार संघाने हे आव्हान 3.1 षटकांत 33 धावा करत पूर्ण करून 9 गडी राखून विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.