सॅन्टियागो – भारताच्या महिला हॉकी संघाची येथे सुरू असलेल्या स्पर्धेत चांगलीच घोडदौड सुरू आहे. शुक्रवारी या महिला संघाने चीलीच्या वरिष्ठ संघाविरुद्धची लढत 2-2 अशी बरोबरीत राखली.
गुरुवारी महिला संघाने त्यांच्या ज्युनिअर संघाचा 3-2 असा पराभव केला होता. शुक्रवारी झालेल्या सामन्यात मात्र, दोन्ही संघांनी चांगलीच लढत दिली. मारियाना डेल जीझस लगोसने 21 व्या मिनिटाला चीलीकडून पहिला गोल केला. त्याचवेळी दिपीका कुमारीने 40 व्या मिनिटाला गोल करत भारताला बरोबरी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यावर लगेचच 51 व्या मिनिटाला फ्रेमांडा विलेग्रीननेगोल करत चीलीला पुन्हा एकदा आघाडी प्राप्त करून दिली. मात्र, त्यांचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. 55 व्या मिनिटाला गगनदीप कौरने 55 व्या मिनिटाला गोल केला व भारतीय संघाला पुन्हा एकदा बरोबरी मिळवून दिली.
उर्वरीत खेळात दोन्ही संघांना एकमेकांचा बचाव भीेदता आला नाही व सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अफलातून होत आहे. या स्पर्धेत भारताने तीन सामने जिंकले आहेत.