कृष्णन अप्पा निमंत्रित हॉकी स्पर्धा : इन्कमटॅक्‍स संघाला विजेतेपद

पुणे  – पुण्याच्या इन्कमटॅक्‍स संघाने प्रभाकर अस्पत ऍकॅडमी संघाचा पराभव करून येथे पार पडलेल्या डायनमिक स्पोर्टस्‌ ऍकॅडमी आयोजित तिसऱ्या कै. कृष्णन अप्पा स्मृती निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

मेजर ध्यानचंद हॉकी, नेहरूनगर-पिंपरी येथे झालेल्या अंतिम सामन्यात इन्कमटॅक्‍स्‌ संघाने प्रभाकर अस्पत ऍकॅडमीचा पेनल्टी शुट आऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इन्कमटॅक्‍स्‌ संघाकडून विक्रम सिंग याने तर, अस्पत ऍकॅडमीकडून शुभम ठाकूर यांनी गोल केले. पूर्णवेळ ही बरोबरी कायम राहिल्याने पेनल्टी शुटआऊट पद्धतीचा अवलंब करावा लागला. यामध्ये अस्पत संघाकडून अतिश शिर्के यांनी तर, इन्कमटॅक्‍स्कडून रोशन राठोड व राहुल संदेर यांनी गोल करून संघाला विजयश्री मिळवून दिली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयपीआय नेते फारूक शेख, ऑलिंपियन विक्रम पिल्ले यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय संघाचे गोलरक्षक सुरज कारकरा, स्टॅनली डिसुझा, श्रीधरण तांबा, देवदास मार्टीन, गोविंद स्वामी पिल्ले, फिरोज शेख, बन्टी चौहान, संजु मेनन आणि सुधीर अस्पत आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. यावेळी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक विजीन मोरे (प्रभाकर अस्पत ऍकॅडमी), सर्वोत्कृष्ट रक्षक विनोद नायर (एक्‍सलन्स्‌ ऍकॅडमी), सर्वोत्कृष्ट हाफ (अजय मोरे (रेल्वे पोलीस) आणि सर्वोत्कृष्ट फॉवर्ड चिराग मोरे (इन्कम टॅक्‍स) या खेळाडूंना गौरविण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)