भारतीय खेळाडूंचा इस्त्रोला सलाम, ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आमचा सलाम आहे. तुमचे प्रयत्न चालूच ठेवा. ही उमेद जागी ठेवा, यश नक्की मिळेल. आम्हाल तुमचा अभिमान आहे. अशा शब्दांत भारतीय खेळाडूंनी ट्विटरवरून इस्त्रोचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान २ या मोहिमेमध्ये आज विक्रम लॅंडर चंद्रावर लॅंड होणार होत. मात्र, ते लॅंड करत असताना अगदी शेवटच्या काही क्षणी चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. त्यानंतर आज देशभरातून इस्त्रोच्या शास्ज्ञांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच कौतुक केल जात आहे. यामध्ये आता भारतीय खेळाडूंनी देखील इस्त्रोच्या कार्याला सलाम करत त्यांच मनोबल वाढवल आहे. भारतीय क्रिकेटर रिषभ पंत, हरभजन सिंग, शिखर धवन, यांचा यामध्ये समावेश आहे. याबरोबरच कुस्तीपटू योगेश्वर दत्त यानेदेखील ट्विट करत इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.

” तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना माझा सलाम, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. देशाप्रती तुमच्या या कतृत्त्वाला आमचा सलाम.” अशा शब्दांत ट्विट करत रिषभ पंतने इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.

हरभजन सिंग म्हणतोय की ” कोशिश करनेवालों की कभी हार नही होती, आम्हाला तुमचा आणि सर्व शास्त्रज्ञांचा अभिमान आहे इसरो. हिंदुस्थान झिंदाबाद ” अशा शब्दांत हरभजन सिंगने इस्त्रोचे कौतुक केले आहे.

याबरोबरच भारतीय क्रिकेट टीमचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने देखील ट्विट करत इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. तो ट्विटमध्ये म्हणतो की ” तुमच्या अतुलनीय कार्याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही अपयशी ठरलेले नाही, उलट यशाकडे पाऊल टाकले आहे. तुमचे स्वप्न जिवंत ठेवा.

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त ट्विटमध्ये म्हणतोय की “आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पुढील प्रयत्नांमध्ये आपल्याला यश नक्कीच मिळेल. जय हिंद, जय भारत.”

Leave A Reply

Your email address will not be published.