मॅंचेस्टर सिटीचा धक्‍कादायक पराभव

न्यूकॅसल -इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मॅट रिचीने 80 व्या मिनिटाला केलेल्या पेनल्टी गोलच्या जोरावर न्यूकॅसल युनायटेडने मॅंचेस्टर सिटीचा 2-1 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. या पराभवामुळे प्रीमियर लीग विजेतेपदाच्या शर्यतीत सिटीचा संघ मागे पडला असून अव्वल स्थानी असणाऱ्या लिव्हरपूलकडे 4 गुणांची आघाडी आहे. त्यातच लिव्हरपूलने एक सामनाही कमी खेळला आहे.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करत सर्जिओ अगुवारोने सिटीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिटीचा खेळ आणखी वेगवान आणि आक्रमक झाला. परंतु, गोल करण्यात त्यांना अपयश येत होते. पहिल्या सत्रात 76 टक्के चेंडूवर ताबा असूनही त्यांना आघाडी वाढवता आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मॅंचेस्टर सिटीने दुसऱ्या सत्रातही आक्रमक सुरुवात केली. परंतु, 66 व्या मिनिटाला प्रतिआक्रमणात सालोमन रोंडोनने गोल करत न्यूकॅसलला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर सिटीच्या संघाने काही नव्या दमाचे बदली खेळाडू मैदानात पाठवत विजय मिळवण्याचे जोरदार प्रयत्न केले परंतु, 80 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल स्वीकारावा लागल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)