क्रिकेट : टीसीएस, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा विजय

5वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – टीसीएस संघाने वाईन एन्टरप्रायझेस संघाचा तर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा पराभव करत येथे होत असलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकुच केली.

व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्‌स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत राहुल गर्गच्या नाबाद अर्धशतकी केळीच्या जोरावर टीसीएस संघाने वाईन एन्टरप्रायझेस संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना वाईन एन्टरप्रायझेस संघाने 20 षटकात 5 बाद 154 धावा केल्या. यात अजिंक्‍य नाईकने 59 तर आशिष सुर्यवंशीने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 154 धावांचे लक्ष टीसीएस संघाने 19 षटकात 4 बाद 155 धावा करून पुर्ण केले. यात मयंक जासोरेने 36 व गौरव भालेरावने 33 धावा करून गौरवला सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला. 35 चेंडूत नाबाद 58 धावा करणारा राहुल गर्ग सामनावीर ठरला.

तर, दुसऱ्या लढतीत अभिजीत जगतापच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अभिजीत जगताप, अमित कदम व ओमकार पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे किर्लोस्कर ब्रदर्स संघ केवळ 13.3 षटकात सर्वबाद 71 धावांत गारद झाला. 71 धावांचे लक्ष विराज काकडेच्या, अजित गव्हाणेच्या नाबाद 17 व सिध्देश वारघंटेच्या नाबाद 14 धावांसह सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने केवळ 9.2 षटकात 3 बाद 72 धावा करून सहज पुर्ण केले. 8 धावांत 4 गडी बाद करणारा अभिजीत जगताप सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल –

साखळी फेरी वाईन एन्टरप्रायझेस- 20 षटकांत 5 बाद 154 (अजिंक्‍य नाईक 59, आशिष सुर्यवंशी 44, अनिकेत पोरवाल नाबाद 24, अभिनव कालिया 2-27, मयंक जासोरे 1-28, गौरव सिंग 1-32) पराभूत वि टीसीएस- 19 षटकांत 4 बाद 155 (राहुल गर्ग नाबाद 58, मयंक जासोरे 36, गौरव भालेराव 33, गौरव सिंग 26, धनराज परदेशी 2-18, आशिष सुर्यवंशी 2-43)

किर्लोस्कर ब्रदर्स- 13.3 षटकांत सर्वबाद 71 (संतोष दिघे 19, यतिन कावणकर 17, अभिजीत जगताप 4-8, अमित कदम 2-8, ओमकार पाटील 2-15, सिध्देश वारघंटे 1-17) पराभूत वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 9.2 षटकांत 3 बाद 72 (विराज काकडे 20, अजित गव्हाणे नाबाद 17, सिध्देश वारघंटे नाबाद 14, संतोष दिघे 3-22).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.