महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 स्पर्धा : क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाची आगेकूच

पुणे  – अतुल विटकर याने केलेल्या नाबाद 70 धावांच्या खेळीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकादमीचा 1 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आपला पहिला विजय नोंदवला.

व्हिजन क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. पहिल्यांदा खेळताना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाला 33.5षटकात 226धावापर्यंतच मजल मारता आली. यात यश नाहर 68, अभिनव पुरी 58, ऋषभ राठोड 35, शुभम दोशी 15यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.

क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाकडून सय्यद जमाल(3-23), प्रज्वल गुंड(2-46), संकेत चव्हाण(2-56) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाला 226 धावांवर रोखले. याच्या उत्तरात क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने 40षटकात 9 गडयाच्या बदल्यात 228धावा करून हे आव्हान पूर्ण केले. अतुल विटकरने 53 चेंडूत 7चौकार व 3षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अतुलला युवराज झगडे 38, देव डी 35, रजनीकांत पडवळ 21, सुजित उबाळे 20 यांनी धावा काढून सुरेख साथ देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हेमंत पाटील क्रिकेट अकादमीकडून ऑस्टिन लाझरसने 46धावात 4 गडी बाद केले. सामन्याचा मानकरी अतुल विटकर ठरला.

सविस्तर निकाल – साखळी फेरी –

हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ: 33.5 षटकांत सर्वबाद 226 (यश नाहर 68, अभिनव पुरी 58, ऋषभ राठोड 35, शुभम दोशी 15, सय्यद जमाल 3-23, प्रज्वल गुंड 2-46, संकेत चव्हाण 2-56) पराभूत वि. क्‍लब ऑफ महाराष्ट्र : 40 षटकांत 9 बाद 228 (अतुल विटकर नाबाद 70, युवराज झगडे 38, देव डी 35, रजनीकांत पडवळ 21, सुजित उबाळे 20, ऑस्टिन लाझरस 4-46, ऋषी अग्रहर 3-48, जितेंद्र भारती 1-29) सामनावीर-अतुल विटकर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.