पूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट : द किंग्ज, टायफून्स संघाची विजयी सलामी

पुणे – द किंग्ज, टायफून्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पूना क्‍लबच्या वतीने आयोजित पूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. जेट सिंथेसायझर, मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.

पूना क्‍लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत द किंग्ज संघाने सेलर्स संघावर 7 गडी राखून मात केली. सेलर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांत 5 बाद 55 धावा केल्या. द किंग्ज संघाने विजयी लक्ष्य 5.3 षटकांत 1 गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले.

तर, दुसऱ्या लढतीत टायफून्स संघाने टायगर्स संघावर 58 धावांनी मात केली. यात टायफून्स संघाने 1 बाद 107 धावांपर्यंत मजल मारली. टायफून्सच्या विमल हंसराजने 25 चेंडूंत 7 षटकार व 4 चौकारांसह नाबाद 80 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टायगर्स संघाला 3 बाद 49 धावाच करता आल्या.

स्पर्धेचे उद्‌घाटन जेट सिंथेसायझरचे राकेश नवानी, मदर्स रेसिपीच्या संजना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल ढोले पाटील, नितीन देसाई, चेअरमन शशांक हळबे, सुनील हांडा आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा 6 वे वर्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.