अहमदाबाद – दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली असली तरीही आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यातील विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारत व इंग्लंड या दोन्ही संघात चांगलीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
England have won the toss and they are having a bowl first in the third #INDvENG T20I.
🇮🇳
IN: Rohit Sharma
OUT: Suryakumar Yadav🏴
IN: Mark Wood
OUT: Tom Curran pic.twitter.com/EXZ5TXB6Ls— ICC (@ICC) March 16, 2021
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघे ओपनिंग करणार आहेत.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल.
इंग्लंड संघ – इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.