राष्ट्रवादीने पुकारलेल्या “वाई बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोशल मीडियावरून बंदची पूर्वसूचना

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बंदमुळे व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, याची चर्चा झाली. त्यामुळे एक दिवस अगोदर फेसबुक, व्हॉटस्‌ऍप व सोशल मीडियावरून लोकांना बंदची माहिती देण्यात आली. शरद पवार यांच्यावर राजकीय आकसापोटी 

वाई – राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वाई शहर व तालुक्‍यात राष्ट्रवादीने पुुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाईतील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्‍यक सुविधा वगळता मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्यावतीने नायब तहसीलदार राऊत यांना दिलेल्या निवेदनात शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज सकाळी 10 वाजता किसन वीर चौकात उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळपासून महात्मा फुले भाजी मंडई ओस पडली होती. सराफ बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद होती. दवाखाने, औषध दुकाने या अत्यावश्‍यक सुविधा वगळता शहरातील सर्व व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष विक्रांत डोंगरे, उपसभापती अनिल जगताप, शहराध्यक्ष प्रसाद देशमुख, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, भारत खामकर, चरण गायकवाड, राजेश गुरव, संग्राम पवार, बाळासाहेब बागुल, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, अमर जमदाडे, भूषण गायकवाड, दादा पवार, बापू जमदाडे, संदीप नायकवडी, दिलीप हगीर, संदीप जावळे, संदीप डोंगरे, धनंजय हगीर, अजित शिंदे, मतीन जमादार, मोअज्जम इनामदार, मन्नान जमादार, राकेश ओसवाल, प्रवीण जाधव, राजेंद्र तांबेकर, सुनील शिंगटे, लालू सावंत, प्रकाश जाधव, संदीप गायकवाड, बिपिन नायकवडी, अभय पोवळे, महेंद्र ढगे, सचिन अनपट, श्रीकांत सावंत, नरेश सुरशे, भगवान चौधरी, जितेंद्र चौधरी, अकुंश कुंभार उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)