वाघोली – हवेली तालुका पंचायत समिती व तालुका तहसील विभाग यांच्या वतीने तालुकास्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन वाघोली तालुका हवेली येथील सोयरीक गार्डन मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, हवेली उपविभाग उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, अप्पर तहसीलदार हवेली विजयकुमार चोबे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, वाघोली च्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सदस्य रामकृष्ण सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनीलचाचा जाधवराव, राजेंद्र वारघडे, अनिल सातव पाटील, केतन जाधव, विनायक नाथ,धीरज आगरकर, गणेश चौधरी, ऋषिकेश कटके, नितीन आडगळे, सौरभ जगलपुरे, सतपाल सातव , सारंग मगर, राजेंद्र कासार, प्रसाद कदम, जावेद शेख, रणजीत जवळकर, तोफिक शेख, चरण, ओंकार जाधवराव आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. जवळपास शंभर च्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान या शिबिरात केले.