नेवाशात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासे  – पावसाचे वातावरण असतानाही त्यांची परवान न करता नेवासे तालुक्‍यात मतदारांनी मतदानाला उस्फूर्त उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याने केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

तालुक्‍यात सकाळपासून भेंडे येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान यंत्र सुरू होण्यास विलंब झाल्याने केंद्रांवर दोन दोन तास ताटकळत बसावे लागले. यावेळी मात्र मशीन बंद चालूचा अनुभव मतदारांना आला नाही. अपंग मतदारांना व्हील चेअर नसल्याने तसेच अनेक सुविधाचा अभाव असल्याने निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ यानिमित्ताने समोर आला. तालुक्‍यात मतदान केंद्रावर किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. तालुक्‍यात दोन लाख 62 हजार 137 मतदार असून दुपारी 3 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले होते.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कुटूंबियांसह देवगाव या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई गावात मतदानाचा हक्क वाजवला तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषद सदस्य तेजस्वी लंघे यांनी शिरसगाव या गावी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये रिमझिम पावऊ सुरू होता. असे असतांना मतदानासाठी नागरिक येत होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसत होते. विशेषतः महिला वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता.

मतदान यंत्रातील बिघाड दुरूस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची एक टीम कार्यरत होती. या ठिकाणी एकास एक लढाई असल्याने मतदान घडून आणण्यासाठी इतर मतदानाच्या तुलनेत कार्यकर्तेचा उत्साह इतर निवडणूकच्या तुलनेत वेगळाच आढळून आल्याचा अनुभव अनेकांनी बोलून दाखवल्याने मतदानाचा आकडा वाढणार हे नक्कीच असल्याचे वातावरण निर्मिती दिवसभरात झाली होती.

सखी मतदान केंद्र म्हणून कोठेच वाटले नाही. सखी केंद्र वेगळे म्हणून फुग्यांनी आकर्षक पद्धतीने सजविण्याला हवे होते. तसे न सजवल्याचे दिसून आले. या सखी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली या केंद्रावर उत्साह दिसून आला नाही. सर्वच मतदान केंद्रावर दुपारी लांबच रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातही ज्येष्ठांनी सकाळीच मतदान केले.

शेतकरी व महिलांनी मतदान केंद्रात रंगात केल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस निरीक्षक रणजित डेरे आपल्या टीमसह परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. तालुक्‍यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी सभापती सुनीता गडाख, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकुटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी तालुक्‍यातील अनेक गावांना भेटी देऊन मतदानाची परिस्थितीचा आढावा घेतला.

मतदानास विलंब

मतदान यंत्र बंद पडले नाही, मात्र एका मतदाराला मतदान करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचा अनुभव अनेकांना येत असल्याने मतदान होण्यास वेळ लागत असल्याने अनेक रांगा मतदान केंद्रावर लागल्या होत्या. 

Leave A Reply

Your email address will not be published.