सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने एक नवा विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद करत सर्वात जास्त डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम आता अश्विनने आपल्या नावावर केला आहे.
अश्विनने सर्वाधिक 193 डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. मुरलीधरनने आतापर्यंत 191 डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन असून त्याने आतापर्यंत 184 डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. या यादीमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न व ग्लेन मॅकग्रा असून त्यांनी 172 डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले आहे.