फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेल करोनाबाधित…

नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास केवळ काही दिवसांचा अवधी राहिलेला असताना दिल्ली कॅपिटल्स संघातही करोनाने एन्ट्री घेतली आहे. स्टार फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेल याला करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी समोर आले आहे.

करोनाची बाधा झालेला पटेल हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितिश राणा याचाही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आठ ग्राउंड्‌समन करोनाबाधित….

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून प्रारंभ होत असला तरीही आता नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या आठ ग्राउंड्‌समनला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटना व बीसीसीआयच्या गोटात चिंता वाढली आहे. या मैदानावर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे 10 सामने होणार आहेत. 10 ते 25 एप्रिलदरम्यान हे सामने आयोजित करण्यात येत आहेत.

वानखेडे स्टेडियममधील सर्व 19 ग्राउंडस्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी गेल्या आठवड्यात झाली. 26 मार्च रोजी यातील 3 लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी उर्वरित 5 ग्राउंड्‌समनही करोनाबाधित असल्याचे समोर आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.